केंद्रीय मंत्र्यांच्या गाडीला अपघात, पत्नी-स्वीय सहाय्यकाचा मृत्यू

shipad-naik

गोकर्ण (कर्नाटक) – केंद्रीय आयुष मंत्री आणि गोव्याचे खासदार श्रीपाद नाईक यांच्या कारला सोमवारी रात्री कर्नाटकातील उत्तर कन्नडमधील अंकोला येथे भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये त्यांच्या पत्नी विजया नाईक आणि स्वीय सहाय्यक यांचा मृत्यू झाला. अपघातात श्रीपाद नाईक हेसुद्धा जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. यल्लपुरा येथे मंदिरात पूजा करून ते गोकर्णला जात असताना हा अपघात घटला. लवकर पोहोचण्यासाठी त्यांनी एनएच-63 शॉर्टकट पकडला आणि तिथेच घात झाला.

श्रीपाद नाईक हे कारने यल्लपुराहून गोकर्ण येथे जात होते. अंकोला येथील होसाकांबी गावात चालकाचे स्टिअरिंगवरील नियंत्रण सुटल्याने कारला अपघात झाला. नाईक यांनी जो शॉर्टकट पकडला होता तो खूपच खराब होता.

याबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, नाईक यांच्या गाडीची अन्य कोणत्याही वाहनाशी टक्कर झाली नाही. वाहन चालकाचे नियंत्रण सुटले आणि अपघात झाला असे प्रथमदर्शनी दिसतेय. कारमध्ये नाईक यांच्यासह त्यांची पत्नी, चालक आणि स्वीय सहाय्यक होते. अपघातात नाईक यांच्या पत्नीच्या डोक्याला दुखापत झाली. रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, तर काही वेळाने स्वीय सहाय्यकानाही प्राण सोडला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here