मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने मणिकर्णिका या चित्रपटाच्या पुढील भागाची घोषणा नुकतीच केली आहे. पण चित्रपटाच्या घोषणेनंतर कंगनावर चोरीचा आरोप झाला आहे. कंगनाने या चित्रपटाची कथा चोरल्याचा आरोप ‘दिद्दा’चे लेखक आशिष कौल यांनी केला आहे.
आशिष कौल यांनी कंगना रणौत यांच्यावर कॉपीराइटचा आरोप केला आहे. एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की, स्वतः च्या हक्कांसाठी संघर्ष करणारी कंगना माझ्यासारख्या लेखकाच्या हक्कांचं उघडपणे उल्लंघन करत आहे. लेखक कौल पुढे म्हणाले की, कंगनाने कॉपीराइट कायद्याचं उल्लंघन केलं असून हे बेकायदेशीर आहे. तिने देशातील आयपीआर आणि कॉपीराइट कायद्याचं पूर्णपणे उल्लंघन केलं आहे.
ते पुढे म्हणाले की, ‘मला कंगनाचं वागणं समजलं नाही. मी याला बौद्धिक चोरी म्हणेल. आशिष म्हणाले की, कंगना हा दावा करू शकते की ‘दिद्दा’ हे एक ऐतिहासिक पात्र आहे. परंतु दिद्दा बद्दल जगातील कोणत्याही इतिहासकारांनी फारसं काही लिहीलं नाही. याला फक्त अपवाद फक्त इतिहासकार कल्हान आहेत. इतर कोणत्याही इतिहासकारानं काश्मीरची राणी दिद्दावर मोजून दोन पानंही लिहिली नाहीत. या विषयावर मी सहा वर्षे संशोधन करून ही माहिती जमवली आहे.
हमारा भारतवर्ष साक्षी रहा है झाँसी की रानी जैसे कई वीरांगनाओं की कहानी का. ऐसी ही एक और अनकही वीरगाथा है कश्मीर की एक रानी की, जिसने महमूद गजनवी को एक नहीं, दो बार हराया. ले कर आ रहे हैं @KamalJain_TheKJ और मैं, #ManikarnikaReturns: The Legend of Didda 🙏 pic.twitter.com/sgrqkqilj6
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 14, 2021







