नाथनगरीतला सत्कार अविस्मरणीय – सुमित्र श्रीधर माडगूळकर

saumitra-madgulkar

आटपाडी (प्रतिनिधी) – ओसंडून वाहणारे प्रेम , जिव्हाळा ,सदभावना, सदिच्छेने नाथनगरी खरसुंडीत पुजारी परिवाराने केलेला सत्कार- आदरातिथ्य अविस्मरणीय असल्याचे उदगार गदिमांचे नातू सुमित्र श्रीधर माडगूळकर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.

माडगुळे येथे होत असलेल्या गदिमा कविता महोत्सवाच्या निमित्ताने सुमित्र माडगूळकर यांनी सहकुटुंब खरसुंडी येथील नामंकीत पैलवान, खरसुंडीचे माजी सरपंच कै . सितारामबापू भगवान पुजारी आणि पैलवान श्री .लक्ष्मणराव भगवान पुजारी , राष्ट्रवादीचे आटपाडी तालुका सरचिटणीस विजय पुजारी यांच्या जकाई दऱ्यातल्या शेतातल्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत त्यांच्या धर्मपत्नी सौ. प्राजक्ता सुमित्र माडगूळकर , गदिमांची पणती कु . पलोमा सुमित्र माडगुळकर, शासननियुक्त ग दि माडगूळकर स्मारक समितीचे अशासकीय सदस्य तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी हे आले होते.

आम्हां सर्वांचा झालेला सत्कार हा गदिमांच्या पुण्याईचा भाग असून गदिमा आण्णांवर, माडगूळकर परिवारावर माणदेशात व्यक्त होणारे प्रेम, श्रद्धा, सद्‌भावनेने आम्ही सदगदीत झालो आहोत . पुजारी परिवाराने केलेले आदरातिथ्याने मला सहपरिवार इथे मुक्कामी येत इथल्या, परिसरातल्या माडगूळकर प्रेमींच्या समवेत गप्पा गोष्टी करायला आवडेल त्या दृष्टीने मी पुन्हा येथे येणार असल्याचे सुमित्र माडगूळकर यांनी अभिवचन दिले.

यावेळी सुमित्र माडगूळकर, यांचा शाल, श्रीफळ, फेटा, पुष्पहार देवून पैलवान लक्ष्मण भगवान पुजारी यांच्या हस्ते सत्कार करणेत आला . सौ प्राजक्ता माडगूळकर आणि कु पलोमा माडगूळकर यांचा यथोचित सन्मान करणेत आला . श्री . सिद्धनाथांची , गदिमांची प्रतिमा भेट देवून परिवाराचे स्वागत करण्यात आले . यावेळी कु . पलोमा सुमित्र माडगूळकर या चिमुकलीने सादर केलेला गदिमांच्या पोवाड्यातील काही भाग , “काय वाढले पानावरती” हा साभिनय सादर करून उपस्थितांची मने जिंकली . यावेळी माजी सरपंच कै .सीताराम बापू पुजारी यांचे चिरंजीव श्री धनंजय पुजारी ,प्रदीप पुजारी,नाथनगरी संपादक भरत पाटील,डॉ राहुल सावकार,प्रतीक पुजारी संकेत पुजारी, विवेक पुजारी ,अमर सावकार ,सुनील सावकार ,प्रवीण सावकार ,गणेश पुजारी, श्री .घोटीकर सर, पत्रकार नंदू निचळ, चित्रकार प्रतीक अभंगराव,सौरभ निचळ ,सौ कावेरी विजय पुजारी ,आर्या पुजारी, कार्तिकी पुजारी, उज्ज्वला पाटील, प्राजक्ता पुजारी, चंदारानी गुरव ,आश्विनी गुरव दिघंची,रंजना गुरव ,दिपाली गुरव, सुवर्ण गुरव ,सिंधू साळुंखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे नेटके आणि अप्रतिम नियोजन राष्ट्रवादीचे तालुका सरचिटणीस विजय पुजारी यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here