किसान आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुणे येथे संयुक्त किसान मोर्चातर्फे राजभवनावर भव्य ट्रॅक्टर रॅली व घेराव

भव्य-ट्रॅक्टर-रॅली-संकलित-छायाचित्र

नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) – संयुक्त किसान मोर्चा महाराष्ट्राच्या वतीने व महाविकास आघाडी घटकपक्षांच्या पाठिंब्याने दि.२३ जानेवारी २०२१ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त दिल्ली येथील सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदे तातडीने रद्द करावेत, दुध, कांदा यांसह सर्व पिकांना किमान आधारभूत किंमत हमी कायदा तयार करावा या मागणीसाठी पुणे येथे राजभवन घेराव करण्यात येणार आहे.
यासाठी संयुक्त किसान मोर्चा व महाविकास आघाडी घटक पक्षांतर्फे काढलेल्या प्रसिध्दीपत्रकार म्हटले आहे की, दिल्ली येथे गेल्या ५३ दिवसापासून देशातील अनेक भागातील शेतकरी हाडे गोठवणार्‍या थंडीत कुडकुडत आंदोलनामध्ये ठामपणे बसून आहे. आत्तापर्यंत ८५ बांधव शहीद झाले आहेत. शेतकरी आपल्या मागणीवर ठाम आहेत मात्र सरकार दखल घेताना दिसत नाही. त्यामुळे केंद्र सरकारला जागे करण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाच्या वतीने देशभरात दि.२३ जानेवारी रोजी राजभवन घेराव आंदोलन करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील संयुक्त किसान मोर्चाच्या सर्व शेतकरी संघटना व महाविकास आघाडी घटकपक्ष एकत्र येऊन पुणे येथील औंध रोडवरील राजभवनला घेराव घातला जाणार आहे. यासाठी आपण एक दिवस आपला ट्रॅक्टर घेऊन सहभागी व्हायचे आहे. वेगवेगळ्या मार्गाने येणार्‍या ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे नाशिक रोड – दुपारी १२ पर्यंत नाशिक फाटा येथे लाईन मध्ये थांबणे व १२ नंतर खडकी, रेंज हिल्स, मार्गे राजभवन कडे प्रस्थान – करावे., पुणे- नगर रोड – दुपारी १२ पर्यंत येरवडा येथे लाईन मध्ये थांबणे व १२ नंतर येरवडा, संगमवाडी, शिवाजीनगर मार्गे राजभवन कडे प्रस्थान करावे., पुणे-सोलापूर व पुणे-बारामती रोड – दुपारी १२ पर्यंत – रेसकोर्सच्या बाहेर लाईन मध्ये थांबणे व १२ नंतर पुणे स्टेशन, शिवाजीनगर मार्गे राजभवन कडे प्रस्थान, पुणे – लोणावळा, मुळशी व तळेगाव या भागातील ट्रॅक्टर्सनी दुपारी १२ पर्यंत वाकड चौक येथे लाईन मध्ये थांबणे व १२ नंतर राजभवन कडे प्रस्थान करावे., पुणे ‌- सातारा रोड – दुपारी १२ पर्यंत बालेवाडी स्टेडियम येथे लाईन मध्ये थांबणे व १२ नंतर राजभवन कडे प्रस्थान करावे.
ट्रॅक्टर्सवर तिरंगा ध्वज सर्वात उंच, भगवा ध्वज व संघटनेचा ध्वज उतरत्या क्रमाने दर्शनी भागात लावावेत., ट्रॅक्टर्सवर संगीत देशभक्तीपर गीते असावीत. शक्य झाल्यास सोबत तुतारी, हलगी, ढोल, पारंपरिक वेशभूषा याचा वापर असावा., सोबत पिण्याचे पाणी, डोक्यावर टोपी, शिदोरी बांधून आणावी., प्रत्येक गावातील ट्रॅक्टर्सनी आपला ग्रुप सोडून जाऊ नये., दुरच्या जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरसह शक्य नाही त्यांनी दुचाकी किंवा चारचाकी वाहनासह वरील मार्गाने यावे.सहभाग घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी पुणे जिल्हा नितीन थोरात 8329774773, प्रमोद अर्सुळ 9921299888, उमेश शिंदे 9595956004, पुजा झोळे 9975706904, योगेश व्हावळ, सातारा जिल्हा पंजाबराव पाटील 9850771424, कोल्हापूर – सागर धनवडे 9822050905, सोलापूर जिल्हा माऊली हळणवार 8975579050, सांगली जिल्हा डॉ उमेश देशमुख 9503049473, नाशिक जिल्हा हंसराज वडघुले 8888866699, अहमदनगर जिल्हा धनंजय जाधव 9322582484, गणेश बनकर 9922884154, अरूण कान्होरे 8459344865, अनिल देठे 9423201859, बीड जिल्हा – डॉ. उध्दव घोडके 9822687622, उस्मानाबाद – अभयसिंह आडसुळ 9689879010, औरंगाबाद जिल्हा व जळगाव जिल्हा – एस बी नाना पाटील 8788939839, धुळे, नंदुरबार जिल्हा – युवराज सुर्यवंशी 8169369191, कोकण विभाग – सतिश फाटक, लातूर – स्वप्निल कासुगडे 8208893049, परभणी – अतिश गरड 8208618567, इतर जिल्हे – इंजी. शंकर दरेकर 9689595300 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here