झेडपी सीईओ अमन मित्तलांची बदली

aman-mittal-kolhapur

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) – कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांची बदली करण्यात आली आहे. त्यांची बदली लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली आहे. अमन मित्तल मागचे दोन वर्षे कोल्हापूर जिल्ह्यासाठी कार्यरत होते.

दरम्यान, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचाही कार्यकाळ संपत आला आहे. या जागेसाठी कोल्हापूर जिल्हापरिषदेचे सीईओ अमन मित्तल यांच्यानावाची चर्चा सुरू होती. मात्र त्यांची बदली लातून मनपा आयुक्तपदी झाल्याने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कोणाची वर्णी लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. सीईओ अमन मित्तल यांची बदली झाल्याने कोल्हापूर झेडपीसाठी तसेच जिल्हाधिकारी म्हणून दोन नव्या अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार हे निश्चित झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here