मुंबई (विशेष प्रतिनिधी महेश्वर तेटांबे) – हौशी रंगभूमी ते लघु चित्रपट आणि आताच्या वेबसिरीज च्या दुनियेतील आपलं एक वेगळं वलय निर्माण करणारी गुणी आणि मेहनती अभिनेत्री प्रतिक्षा नाईक. भांडुप सारख्या वर्दळ वस्तीत आपलं आयुष्य व्यथीत करणाऱ्या यां अभिनेत्रीने आपल्या करियरची सुरवात अनंत सुतार लिखित आणि महेश तेटांबे-दिपक सावंत दिग्दर्शित ” आस ” यां लघुपटापासून केली.

त्यानंतर सातत्याने काही ना काही करण्याची उमेद मनाशी बाळगून सतत व्यस्त राहणाऱ्या यां अभिनेत्रीने आदित्य फिल्म्स मुंबई निर्मित आणि वैजनाथ चौगुले लिखित आणि दिग्दर्शित श्री दामोदरपंत सदन यां बिगबजेट वेब सिरीज मध्ये आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटविला आहे. प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री चा हात असतो पण प्रतिक्षा नाईक यां अभिनेत्रीच्या बाबतीत मात्रं त्यांच्या काकांचा म्हणजे सिने नाट्य दिग्दर्शक दिपक सावंत यांचा हात आहे आणि त्यांच्या मौल्यवान मार्गदर्शनामुळेच मी इथवर पोहोचू शकले असे त्या म्हणतात. सध्या अभिनयाबरोबर त्या आयुष्य सुंदर फाऊंडेशन यां सेवाभावी संस्थेचे कामकाज पाहतात.







