जळगाव (संपादक सुनिल पाटील) – दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रातील दोन तार्यांची स्टाफ सिलेक्शन द्वारा बीएसएफ पदावर निवड झाली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या स्टॉफ सिलेक्शनद्वारा भुषण पाटील व तुषार पवार यांची बीएसएफमध्ये निवड झाली आहे.
या दोघांनी आपल्या यशाचे श्रेय दिशा स्पर्धा परीक्षा केंद्राचे संचालक प्रा. वासुदेव पाटील यांना दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही हे यश संपादन करु शकल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात सातत्यपूर्ण मार्गदर्शनामुळेच हे यश संपादन करु शकल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्या.
त्यांच्या यशस्वतेबद्दल दिशा स्पर्धा परीक्षा केंद्रात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक प्रा. वासुदेव पाटील, प्रा. उमेश सुर्यवंशी, प्रा. हेमंत साळुंखे, प्रा. कपिलदेव कोळी, राजेंद्र वाघमारे उपस्थित होते.







