जनहित सिने नाटय संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी हरी चंदर आल्हाट

hari-aalhat

महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदावर श्यामभाऊ जांबोलीकर यांची नियुक्ती

मुंबई (विशेष प्रतिनिधी) – जनहित लोकशाही पार्टीचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हाट सद्या पक्षाच्या बांधणी करण्यासाठी पुर्ण महाराष्ट्र भर दौऱ्यावर आहेत व प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची बैठक घेऊन पक्ष वाढविण्यासाठी मार्गदर्शक सूचना देत आहेत .

त्याप्रमाणेच दिनांक २१ जाने २०२१ रोजी जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हाट यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली व स्थानिक कार्यकर्त्यांशी पक्ष बांधणीसाठी चर्चा केली . बैठक संपल्यानंतर जनहित लोकशाही पक्षाचे अध्यक्ष अशोकराव आल्हाट यांनी जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक हरी चंदर आल्हाट यांची जनहित लोकशाही पार्टी प्रणित जनहित सिनेनाट्य संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर तर अखिल पत्रकार कल्याण बहुऊद्देशिय संस्थेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस , महाराष्ट्र तेज न्यूज चॅनलचे संपादक व दैनिक ग्लोबल भारत चे ठाणे जिल्हा प्रतिनिधी मा. श्यामभाऊ जांबोलीकर यांची महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस या पदावर नियुक्ती नियुक्ती केल्याचे जाहीर केले व नियुक्तीपत्र प्रदान केले .

या वेळी नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी चंदर आल्हाट तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्याम भाऊ जांबोलीकर यांनी महाराष्ट्रातील कलावंत यांना आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांचा उदरनिर्वाह चा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक नवीन कलावंत ( हौशी कलावंत ) लहान सहान लघुपट तयार करीत आहेत. अश्या कलावंतांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू असे जाहीर केले. तसेच जेष्ठ व नवीन कलावंतांनी सुद्धा जनहित सिने नाट्य संघटने मध्ये सहभागी होऊन एकमेका सहाय्य करावे असे आवाहन केले. या वेळी जनहित लोकशाही पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अशोकराव आल्हाट , महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष नाडेकर , प्रियांत हांडोरे , इस्माईल शेख , हर्षद पठाडे , सोनाली बढे व अनेक कार्यकर्ते व कलावंत उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here