मराठी भाषा संवर्धन पंधरावड्यानिमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेच्या पुस्तक प्रदर्शनाला कवयित्री सुरेखा गांवडे यांनी दिली भेट

surekha-gavade

मुंबई (प्रतिनिधी लक्ष्मण राजे) – मराठी भाषा संवर्धन पंधरावड्या निमित्त कल्याण डोंबिवली महापालिकेने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाला कवयित्री सुरेखा गावंडे यांनी भेट दिली.
मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या आजीव सभासद असलेल्या वृत्तपत्र लेखिका सुरेखा गावंडे यांची कथा, कवितासंग्रह,अशी अनेक दर्जेदार पुस्तके प्रकाशित झाली आहेत.सुरेखा गांवडे यांनी या पुस्तक प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या विविध विषयांवरील अनेक मराठी पुस्तकांची माहिती घेऊन आवडलेली पुस्तके खरेदी केली.या प्रसंगी सुरेखा गावंडे यांनी चोखंदळ वाचकांना “वाचाल तर वाचाल” असा संदेश दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here