कळवण (प्रतिनिधी महेश कुवर) – कळवण तालुक्यासह पुनद खोऱ्यातील देसराणे येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरिक तसेच राष्ट्रवादी नेते श्री नारायण दगाजी हिरे याच्या हस्ते करण्यात आले. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे याच्या जयंती निमित्त जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला
यावेळी जेष्ठ नागरिक नारायण दगाजी हिरे , पंडित पवार,माजी सरपंच संतोष नेवबा हिरे ,काँग्रेस तालुकाध्यक्ष महेंद्र केदाजी हिरे , युवासेना तालुका प्रमुख अमोल मुन्ना हिरे, महाराष्ट्र राज्य सहकार परिषद सदस्य महेंद्र शिवाजी हिरे , भावराव हिरे, पोलीस पाटील विक्रम खरे ,एम डी जाधव , पंडित हिरे,सतीश कुवर , दिनेश राजभोज , कैलास कुवर, दादाजी हिरे ,उल्हास वाणी, हिरामण शिंदे , कुंदन हिरे, राकेश हिरे , बाळासाहेब कुवर , काकाजी पवार ,भाऊसाहेब हिरे , जगन्नाथ कुवर , संदीप हिरे , भगवान कुवर , किरण बागुल, विनोद कुवर, हरीश कुवर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.









