खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – आज जिल्हा शाखेच्या महत्त्व पुर्ण बैठकीत पैठण तालुक्यातील कडेठाण केंद्रातील प्रभावी व्यक्तीमत्व वसंत दादा पाटील यांचा शिक्षक भारतीतून शिक्षक समितीत जाहिर प्रवेश घेण्यात आला.
पाटील सरांनी शिक्षक समितीत भरिव कामगिरी करण्याचे आश्वासन दिले.यावेळी जिल्हाध्यक्ष विजय साळकर, जिल्हा सरचिटणिस रंजित राठोड मराठवाडा उपाध्यक्ष बबन थोरे,जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सतीश कोळी,औरंगाबाद तालुका सरचिटणिस बबन चव्हाण ,पैठण तालुका कोषाध्यक्ष मोहन राख,तालुका नेते अशोक डोळस यांच्या सह बरेच पदाधिकारी उपस्थित होते.
या निर्णयाचे पैठण तालूक्यातील राज्य नेते गुलाब चव्हाण सर,जिल्हा नेते विष्णू भंडारे ,तालुकाध्यक्ष अर्जुन पिवळ,सुनिल बडे,दादु नरवडे,दिलीप रासने राजेंद्र नागे,नितिन कपटी,भिमराव पंडीत ,अशोक भाग्यवंत,गोवर्धन खाडे,प्रवीण उडाळे,दादा बडे,अशोक बडे,कडेठाण केंद्रातील बंडुनाना घुले,संजय लबडे,महेश उकर्डे ,अरुण फड,पंडीत चव्हाण यांनी स्वागत केले.अजूनही बरेच शिक्षक शिक्षक समितीत प्रवेश करणार असल्याचे वसंत पाटील यांनी सांगितले..







