खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा पगार तीस टक्के कपात करा या निर्णयाचे शिक्षक समिती कडून स्वागत करण्यात आले आहे. तसेच हा निर्णय घेतल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्षा मिनाताई रामूकाका शेळके यांचे शिक्षक समितीच्या वतीने अभिनंदनही करण्यात आले.
काल औरंगाबाद जिल्हा परिषदेत जे अधिकारी-कर्मचारी आई-वडिलांचा सांभाळ करणार नाही त्यांची चौकशी अंती पगारातून 30 टक्के पगार कपात करून आई-वडिलांच्या खात्यात वळती करण्याचा ठराव काल औरंगाबाद सभागृहात एकमताने पारित झाला या ऐतिहासिक व क्रांतिकारक निर्णयाचे शिक्षक समितीने जोरदारपणे समर्थन करून या बद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिनाताई रामूकाका शेळके यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी शिक्षक समिती औरंगाबादचे जिल्हाध्यक्ष विजय साळकर,जिल्हा सरचिटणीस रंजित राठोड,जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी, तालुका कोषाध्यक्ष विलास चव्हाण,तालुकाध्यक्ष कडूबा साळवे,उपाध्यक्ष अनिल कर्डीले,बबन चव्हाण,अंकुश वाहूळ,अंकुश इथर आदी उपस्थित होते.







