खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – आज दि.23 जानेवारी रोजी,खिर्डीच्या नवनिर्वाचित सदस्या.. मुक्तानंद शाळेचे शिक्षक,सुरेश हिवर्डे यांच्या पत्नी रुपालीताई हिवर्डे यांची खिर्डी ग्रामपंचायत सदस्यपदी निवड झाल्याबद्दल खुलताबाद शिक्षक मित्र मंडळाकडून शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिक्षक समितीचे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख सतीश कोळी,, कमला नेहरू शाळेचे गिरीधर खंडागळे विलास वाकळे,मराठी माध्यमिक विद्यालयाचे आण्णासाहेब निकम,प्रविण डघळे,सुनील पाटील,कलीम शेख,यशोदिप शाळेचे राजाभाऊ वायाळ,बोडका हायस्कूलचे कैलास ससे,मुक्तानंद शाळेचे मुख्याध्यापक सुभाष बरगळ, किशोर गोराडे,शशिकांत दौड, अंकुश अंभोरे,तयब्बू पठाण, डि.बी.पाटील,सुधाकर पाटील, सोत्रे भाऊ,गुरुकुलचे आनंद गंगवाल,इंग्रजी माध्यमाचे संजय तुपे आदी उपस्थित होते.







