बाजार सावंगी (प्रतिनिधी मुनीर शाह) – खुलताबाद पोलिस ठाण्याला तक्रार निवारण दिनाचा पडला विसर महाराष्ट्र शासनाच्या विभागाच्यावतीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पोलिस ठाण्यात मोठ्या गाजावाजा ने हा.तक्रार निवारण दिन सुरू करण्यात आले गृह विभागाच्या वतीने दर शनिवारी 10 ते 1 या वेळेच्या दरम्यान आयोजित करण्यात आले यात तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण होऊन तक्रारदारांना न्याय मिळण्यास मदत होते परंतु मागील कित्येक महिन्यापासून पोलीस ठाण्यातील.तक्रार निवारण दिवस बंद पडले आहे
तक्रार दिनी पोलीस उपअधीक्षक पोलीस उपविभागीय अधिकारी पोलिस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक यापैकी एकही वरिष्ठ अधिकारी हजर नसल्याने व तक्रारदारांना तक्रार दिनाची कुठलीही पूर्वसूचना दिली जात नाही वरील अधिकाऱ्यांनी तर या तक्रार दिनाचा पार वाट लावून टाकली असून पुरता फज्जा उडाला आहे अधिकारी तक्रार दिनात हजर राहत नसल्यामुळे तक्रारदारांनी याकडे पाठ फिरविल्याचे व पोलीस प्रशासन विरुद्ध उदासीनता असल्याचे चित्र आहे या अधिकार्याकडून तक्रार निवारण दिनाची कुठल्याच प्रकारची अंमलबजावणी होत नसल्याने व शासनाचे सर्व नियम धाब्यावर ठेवून आपल्या मनमानी पद्धतीने पोलिस ठाण्याचे काम काज चालू आहे
गृह विभागाच्या गावाच्या वतीने दर शनिवारी पोलीस ठाण्यात 10 ते 1 या दरम्यान असतो तक्रार निवारण दिवस असतो तक्रार निवारण पडल्याचे व विसर पडल्याचे दिसून येत आहे तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण होऊन तक्रारदारांना तक्रारीचा निपटारा होऊन न्याय मिळण्यास मदत होते परंतु त्याच्या उलट होत आहे मागील कित्येक महिन्यांपासून तक्रार निवारण दिवस बंद पडले असून आतापर्यंत कुठल्या तक्रारी तक्रारदाराचे तक्रारीचे निवारण करण्यात आल्याचे दिसून आले नाही तक्रार तक्रारदार यांनी कित्येक वेळा पोलिस स्टेशनला हेलपाटे मारूनही तक्रार दिनी एकही वरिष्ठ अधिकारी हजर राहत नाही या अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेची तर पार वाट लावली आहे. तक्रार निवारण दिवस फक्त आणि फक्त नावालाच राहिला आहे बंद पडलेल्या तक्रार निवारण दिवसाकडे वरिष्ठ अधिकारी मोक्षदा पाटील औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी जातीने लक्ष देऊन पूर्ववत चालू करावे अशी मागणी खुलताबाद शहरासह ग्रामीण भागातील तक्रारदारांनी व नागरिकांनी केली आहे







