जिल्हाधिकारी कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी

aurangabad-collector-office

खुलताबाद (प्रतिनिधी सलमान खान) – औरंगाबाद जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

निवासी उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर, उपजिल्हाधिकारी (सा.प्र) रिता मेत्रैवार, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मंदार वैद्य, जिल्हा पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) संगिता सानप, नायब तहसिलदार (सा.प्र) शैलेश पटवारी, नायब तहसिलदार (निवडणूक) धनजकर, नायब तहसिलदार (गृह) वैशाली डोंगरजाळ, एस ए बोरगे(अ.का) यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प वाहून आदरांजली वाहिलीnetaji-subashchndra-bose

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनकार्यावरील माहितीपट ही दाखविण्यात आला.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोमल औताडे यांनी केले.

 

ppt-at-aurangabad-collector-office

collector-aurangabad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here