यावल नगराध्यक्षपदी सौ. नौशाद तडवी यांची बिनविरोध निवड

  • 125 वर्षात प्रथमच आदिवासी तडवी समाजाला मिळाली संधी.
  • अध्यक्ष निवडीचे श्रेय अतुल पाटील यांना.

यावल ( सुरेश पाटील) – यावल येथील नगरपालिका अध्यक्षपद राखीव असल्याने 125 वर्षात प्रथमच आदिवासी तडवी समाजाला सौ.नौशाद तडवी यांच्या माध्यमातून प्रथमच बिनविरोध निवडीची संधी मिळाली. सौ. नौशाद तडवी यांना यावल नगरपरिषदेचे अध्यक्षपद मिळणेचे संपूर्ण श्रेय माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील यांच्याकडे जाते.
यावल नगराध्यक्षपदी सौ. नौशाद तडवी यांची बिनविरोध निवड ऑनलाइन पद्धतीने करण्यात आली आज दिनांक 14 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता नगरपालिकेच्या सभागृहात प्रांताधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, मुख्याधिकारी बबन तडवी, प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांच्या उपस्थितीत अध्यक्षपदाची निवड करण्यासाठी विशेष सभा झाली. त्यात नगरसेवकांनी ऑनलाईन पद्धतीने सहभाग नोंदविला. बिनविरोध निवड जाहीर होताच प्रांत थोरबोले,सी.ओ.बबन तडवी,राकेश कोलते यांनी नवनिर्वाचित अध्यक्षा सौ.नौशाद तडवी यांचे स्वागत केले.
नगरपालिका सभागृहात अध्यक्षपदाची निवड झाल्यानंतर अध्यक्षा सौ.नौशाद तडवी यांच्या निवासस्थानी यावल नगरपालिका सदस्य व महिला सदस्यांनी व इतर काहींनी भेट देऊन नवनिर्वाचित अध्यक्षा सौ. तडवी यांचे स्वागत, अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. यात प्रामुख्याने माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल पाटील, मावळते प्रभारी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश कोलते यांच्यासह प्रा. मुकेश येवले, अभिमन्यु चौधरी, सौ.रुखमाबाई महाजन, सौ. देवयानी महाजन, सौ.पौर्णिमा फालक, सौ.रेखा युवराज चौधरी, सौ. कल्पना दिलीप वाणी. शेख असलम शेख नबी, श्रीमती शीला सोनवणे यांनी अभिनंदन केले तर प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, मुख्याधिकारी बबन तडवी, प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते यांनी केले नवनिर्वाचित अध्यक्षांचे स्वागत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here