खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे बस सुरू झाल्याने वारकऱ्यांनी मानले खासदारांचे आभार
चाळीसगांव (प्रतिनिधी) – गेल्या 21 मार्च पासून कोरोना सारख्या महामारी मध्ये बससेवा बंद करण्यात आली होती. गेल्या पंधरा दिवसांपासून टप्प्याटप्प्याने बस सेवा सुरू केलेली असताना मात्र पंढरपूर जाण्यासाठी बस बंद होती. खासदार उन्मेश दादा पाटील यांच्या प्रयत्नातून आज तातडीने पंढरपुर जाणारी बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. आधीची बस लांब पल्ल्याच्या मार्गाने जात असल्याने नवीन नवीन बस सेवा ही औरंगाबाद,नगर ,करमाळा, टेंभुर्णी मार्गे पंढरपूर अशी सुरू करण्यात आली असल्याने भाविकांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे
आज खासदार उन्मेशदादा पाटील यांचे वडील तथा दरेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच भैय्यासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते तसेच नगरसेविका विजयाताई भिकन पवार, डेपो मॅनेजर संदीप निकम साहेब यांच्या उपस्थितीत या बससेवेचा प्रारंभ करण्यात आला. या प्रसंगी सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प. बबन दादा पवार, आगार व्यवस्थापक संदीप निकम,ह.भ.प. सुधाकर तात्या पाटील, सुरेश आप्पा पवार, सुधीर पवार ,सुनील पवार, अर्जुन पवार,दीपक पवार ,निखील भाऊ पवार, गोरख पवार, सचिन पवार, शांताराम पाटील(वाहतूक नियंत्रक) रमेश राठोड (वाहतूक नियंत्रक ) अधिकारी नितीन पाठक, आबा पाखले साहेब,रवी लोधे ,चांदणे साहेब आदी मान्यवर उपस्थित होते.आज पंढरपूरबस सेवा सुरू होणार असल्याने व्हाट्सअपवर जनजागृती करण्यात आली होती त्यामुळे बस सेवेतुन वारकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेत खासदार उन्मेशदादा पाटील यांचे आभार मानले.
गेल्या सात-आठ महिन्यांपासून पंढरपूर जाणारी बस विभाग बंद असल्याने खासदार उमेश दादा पाटील यांच्याकडे वारकरी संप्रदायाचे ह.भ.प. बबन पवार, नगरसेविका विजयाताई भिकन पवार तसेच शहरातील वारकऱ्यांनी सातत्याने मागणी लावून धरली होती. खासदार उन्मेश दादा पाटील यांनी स्वतः जिल्हा आगार व्यवस्थापक यांच्याशी बोलून तातडीने ही बससेवा सुरू करावी अशी असे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने चाळीसगाव पंढरपुर बस सेवा सुरू करण्यात आली आहे भाविकांची मोठी सोय झाल्याने वारकरी संप्रदायातील परिवाराच्यावतीने खासदार उन्मेशदादा पाटील यांचे वारकऱ्यांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले आहे. “पुंडलिक वरदा हरी विठ्ठल” च्या गजरात ही बस रवाना करण्यात आली.याप्रसंगी भैय्यासाहेब पाटील यांच्या हस्ते चालक ,वाहक,आगार व्यवस्थापक यांचा सत्कार करण्यात आला.







