हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवा सेनेतर्फे होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटप

yuva-sena-jalgaon

जळगाव (संपादक सुनिल पाटील) – आज दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त युवासेना सचिव दुर्गा ताई भोसले यांच्या मार्गदर्शनाने प्रतिमापूजन व होतकरू विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमासाठी शिवसेना महानगर प्रमुख शरद भाऊ तायडे, स्थानिक नगरसेवक दिलीप दादा पोकळे, युवा सेना उपजिल्हा अधिकारी पियुष भाऊ गांधी, माजी नगरसेवक जाकिर पठाण आधी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन लोकमान्य युवा प्रतिष्ठान अध्यक्ष महेश ईश्वर ठाकुर यांनी केले होते.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी राकेश थोरात चेतन जाधव श्रीकांत चव्हाण मयूर बडगुजर यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमासाठी अंकित कासार जय मेहता सारंग चौधरी रोशन पाटील विकास सपकाळे चेतन चौधरी मनोज पोकळे विशाल परदेशी ललिता आमोदकर ललित कोतवाल धनंजय जैस्वाल युवासैनिक व शिवसैनिक लोकमान्य युवा प्रतिष्ठान चे सदस्य उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here