खासगी वाहनांवर प्रेस किंवा पोलीस लिहिल्यास होणार कारवाई

vechicle

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मीरा-भाईंदर, वसई-विरार परिमंडळ-1 वाहतूक विभागनी प्रेस पोलीस असे स्टिकर खासगी वाहन दिसल्यास कारवाई करणार, असा आदेश जारी केला आहे. आतापर्यंत वाहतूक विभागांनी 65 वाहनांवर कायदेशीर कारवाई केली आहे, अशी माहिती वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

मीरा भाईंदर शहरात प्रेस किंवा पोलीस स्टीकर लावलेल्या खासगी वाहनांवर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. मीरा भाईंदर शहरातील 65 वाहनांवर पोलिसांनी कारवाई केली असून ही कारवाई पुढे देखील सुरू राहणार आहे. दिवसेंदिवस प्रेस हे अनेक वाहांनवर आपण पाहत असतो मात्र ते अधिकृत आहे की अनधिकृत यांची देखील पोलीस शोध लावणार आहे. त्यामुळे आपल्या वाहनांवर प्रेस किंवा पोलीस स्टीकर असेल तर तत्काळ काढावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

खासगी वाहांनवर अनेक व्यक्ती प्रेस किंवा पोलीस लिहून मिरवत असतात. मात्र, त्यांचा पत्रकारितेशी किंवा पोलिसांशी काही संबंध नसतो, असे देखील अनेक प्रकरण समोर आले आहेत. प्रेस किंवा पोलीसचे स्टिकर लावून टोल फ्री करण्यासाठी देखील प्रयत्न करतात. मात्र, हे कायद्याने गुन्हा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असताना त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. यामुळे मीरा भाईंदर वसई विरार पोलिसांनी आता बोगस स्टिकर लावून मिरवणाऱ्या व्यक्तींविरोधात जोरदार कारवाई करणार आहे. बोगस पत्रकारांचा सुळसुळाट कुठे तरी थांबला पाहिजे यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here