डॉक्टरांना आव्हान : गेल्या पाच महिन्यांपासून ‘ती’ आहे कोरोनाग्रस्त, 31 वी चाचणीही पॉझिटिव्ह

भरतपूर (राजस्थान) – येथील एक महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित असून तिची 31 वेळा टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. देशातली अशाप्रकारची पहिली केस असून डॉक्टरांसाठी या महिलेवर नेमके निदान करणे आव्हान समजले जातेय.

शारदा देवी असे त्या महिलेचे नाव आहे. कमीतकमी चौदा दिवसात कोरोनाचा रुग्ण बरा होतो. पण राजस्थानच्या भरतपुरच्या एक महिला गेल्या पाच महिन्यांपासून कोरोना संक्रमित आहे. 30 वर्षाच्या शारदा देवी यांच्या 31 टेस्ट झाल्या आहेत. यामध्ये 17आरटी पीसीआर आणि 14 रॅपिड एंटीजन टेस्ट केल्या आहेत. आतापर्यंत त्यांच्यावर अॅलोपेथी, होमियोपेथी आणि आयुर्वेदीक उपचारपद्धती केली आहे, मात्र त्यांच्यावर काहीही परिणाम होताना दिसत नाहीय.

डॉक्टर या केसबाबत हैराण आहेत. कारण कोरोना रिपोर्ट वारंवार पॉझिटिव्ह येऊनही शारदा देवी यांची तब्येत उत्तम आहे. या दरम्यान त्यांचे वजनही 8 किलो वाढले आहे. डॉक्टरांसाठी शारदा देवी यांची केस आश्चर्यच आहे. अशाप्रकारची देशातली ही पहिली केस असेल असे डॉक्टरांचे म्हणने आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here