32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान

rashtriya-bal-purskar

नवी दिल्ली – देशातील 32 बालकांना प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2021 प्रदान करण्यात आले आहेत. केंद्र सरकार नवनिर्माण, शैक्षणिक यश, क्रीडा, कला आणि संस्कृती ,समाज सेवा, आणि शौर्य या क्षेत्रात अपवादात्मक क्षमता आणि उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मुलांना हे पुरस्कार प्रदान करते.

या पुरस्कारार्थी बालकांत 21 राज्ये/केंद्रशासित प्रदेशातील 32 जिल्ह्यांतील मुलांचा समावेश आहे. 7 पुरस्कार कला आणि संस्कृती क्षेत्रातील बालकांना, 9 पुरस्कार नवनिर्मिती क्षेत्रातील बालकांना, 5 बालकांना शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरी बद्दल पुरस्कार देण्यात आले आहेत. 7 बालकांना क्रीडा क्षेत्रात, 3 बालकांना शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून एका बालकाला त्याच्या समाज सेवेच्या क्षेत्रातील प्रयत्नांसाठी सन्मानित करण्यात आले आहे.

या यश संपादन करणाऱ्या तरुण (लहान) मुलांचे कौतुक करताना राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटले आहे “मला आशा आहे की प्रधानमंत्री बाल पुरस्कार -2021 केवळ विजेत्यांनाच प्रेरणा देईल असे नव्हे तर इतर कोट्यवधी मुलांना स्वप्ने पहायला आकांक्षांनी प्रेरित व्हायला, तसेच आपल्या मर्यादा वाढवायला प्रेरणा देतील. आपण सर्व जण आपल्यातील सर्वोत्तमाने देशाला यशाच्या नव्या शिखरावर आणि समृध्दीकडे नेण्यासाठी प्रयत्नशील राहू या.” पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (सोमवारी) या सर्व पुरस्कारार्थी बालकांशी व्हिडीओ काँन्फरन्सद्वारे संवाद साधणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here