शहादा तालुक्यातील वाघोदा येथे कृषी महोत्सव उत्साहात संपन्न

krushi-mahotav-shahada

शहादा (प्रतिनिधी रामेश्वर गिरासे) – शहादा तालुक्यातील वाघोदा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर कृषी महोत्सव कोरोना पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करीत कृषी महोत्सव संपन्न झाला. दरवर्षी स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित नाशिक येथे होणारा कृषी महोत्सव कोरोना पार्श्वभूमी बघता शेतकऱ्यांच्या बांधावरील कृषी महोत्सव वाघोदा या ठिकाणी श्री स्वामी समर्थ जिल्हा केंद्र नंदुरबार यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रम शेतकऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला प्रमुख वक्ते म्हणून मंगेश जीवन देवरे व शेतकरी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले होते. यात सेवामार्गातील १८ ग्रामअभियान सेंद्रिय शेतीच्या प्रात्यक्षिक सह कृषी विषयक माहिती व मार्गदर्शक वेगवेगळे स्टॉल प्रदर्शित करण्यात आले होते बांधावरील या कृषी महोत्सवात शेतीवरील रासायनिक खतांचे दुष्परिणाम, सेंद्रिय खतांचा फायदा व शेतकऱ्याचे उत्पन्न कसे वाढेल, उत्पादनाला भाव कसा मिळेल, तसेच कृषी विषयक जोड व्यवसाय प्रक्रिया उद्योग, आधुनिक शेती अवजारे व देशी – गावरान बियाणांवर मार्गदर्शन करण्यात आले.krushi-shahada

या महोत्सवाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती काळाची गरज असून विषमुक्त शेती करण्यासाठीचे उपाय करणे आवश्यक आहे. आध्यात्मिक व सेंद्रिय शेती सह बालसंस्कार, युवा संस्कार, मराठी अस्मिता या विषयांवर प्रमुख वक्ते म्हणून आदरणीय मंगेश जीवन देवरे यांनी सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पंचक्रोषीतील सरपंच, पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी, पंचायत समिती सदस्य, कृषी सहाय्यक व शेतकरी महिला व पुरुष यांनी उपस्थिती लावली. कार्यक्रमास शहादा केंद्र, काथर्दे, वैजाली, वाघोदा, नांदर्डे, परिवर्धा तसेच बरेचशे सेवा केंद्रातील सेवेकरी, ग्रामस्थ, शेतकरी यांनी कार्यक्रमास सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here