अनाथाची माऊली : पोलिस कर्मचारी सलमा शेख यांनी बेवारस चिमुकल्याला दिले स्तनपान….!

police-constable-salama-shaikh

यवतमाळ (विशेष प्रतिनिधी) – हिगोली बसस्थानकावर एक पाच ते सहा महिन्याच्या चिमुकल्या बालकास कोणीतरी सोडून गेला. हिंगोली शहर पोलीसांनी त्या चिमुकल्या बालकास ताब्यात घेऊन सामान्य रूग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक होती.

बालकास आईच्या दुधाची नितांत गरज होती. बालरोग तज्ञांनी त्यास आहार म्हणून दुध पावडर ड्रापने देणे सुरू केले. परंतु त्याला दूध पावडरने गॅसेस होत होते. त्यामुळे रुग्णालयातील प्रसूती वार्डातील मातांना सदरील बेवारस अनाथ बालकास स्तनपान करण्याची विनंती करण्यात आली. परंतु कुणी पुढे आले नाही. यामुळे उपस्थित खाकी वर्दीतील माऊलीला माणूसकीचा पाझर आला. हिंगोली शहर पोलीस ठाण्यात पोलिस दलात कार्यरत असणाऱ्या पोलिस कर्मचारी सलमा शेख यांचे मातेरूपी मन जागृत झाले. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी बेवारस सापडलेल्या चिमुकल्याला कवेत घेऊन स्तनपान केले. येथेच माणूसकी गहिवरून आली.salama-shaikh-hingoli

मातेच्या हदयाच्या माऊलीने माणूसकीचे जिवंत दर्शन दिले. एकीकडे जात,पात,धर्म यावरुन समाजमन ढवळून जात असतांना पोलिस कर्मचारी सलमा शेख या भगिनींने समाजाला एक आदर्श पायवाट योगायोगाने करून दिली आहे. यावेळी त्यांच्या समवेत पोलिस कर्मचारी सुरेखा अत्राम, शारदा ढेंबरे उपस्थित होत्या.

या संदर्भात अनाथाची माऊली सलमा शेख यांना बोललो असता त्यांनी सांगितले की, आम्ही त्या चिमुकल्यास रूग्णालयात अॅडमिट असतांना वेदना जाणून घेतल्या. तो गॅसेस मुळे सारखा रडत होता. डॉक्टरांनी स्तनपान करण्याची विनंती करून कुणी पुढे येत नव्हते. मला दोन वर्षीय मुलगी आहे. मी अक्षरशः बालकाची अवस्था पाहून गहिवरून गेले. त्यास स्तनपान केले व करीत राहिल. त्यांच्या या अतुलनीय कार्याला बुलंद पोलिस टाईम्सतर्फे मानाचा सलाम!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here