उद्या जाहीर होणार बारावीचा निकाल

मुंबई (हितेश मिस्त्री) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लांबणीवर पडलेला आणि बहुप्रतिक्षीत असणारा बारावीचा निकाल उद्या (गुरुवारी) जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांनी हा निकाल वेबसाईटवर पहावा, त्यासाठी महाविद्यालयात गर्दी करु नये, असे मंडळाने सूचित केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी – मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या १२ वी परिक्षेचा निकाल उद्या (दि.१६) जाहीर होणार आहे. दुपारी १ वाजता मंडळाच्या maharesult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर हा निकाल विद्यार्थी व पालकांना पाहता येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here