जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यातील कोरोना संशयित व्यक्तींचे स्वॅब तपासणीचे आज (दि.१५) प्राप्त झालेल्या अहवालानुसार २६१ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.दरम्यान १४७ रुग्ण बरे होऊन आज घरी गेले आहेत. एकूण कोरोनाबाधीतांची संख्या ६ हजार ६५४ झाली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधिक ८४ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात जिल्ह्यात ९ कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या रूग्णांमध्ये जळगाव शहर ८४, जळगाव ग्रामीण ५, भुसावळ १४, अमळनेर ९, चोपडा ४०, पाचोरा ३, भडगाव ५, धरणगाव १६, यावल ११, एरंडोल २, जामनेर ११, रावेर १९, पारोळा २ , चाळीसगाव ९, मुक्ताईनगर २४, बोदवड १, अन्य जिल्ह्यातील सहा अशी रूग्ण संख्या आहे. कोरोनामुळे दिवसभरात ९ बाधीत रूग्णांचा मृत्यू झाला आहे. यात जळगाव शहर ५, चोपडा तालुक्यातील २, पाचोरा व रावेर तालुक्यातील प्रत्येकी एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले २१६३ कोरोना बाधित रुग्ण आहेत यापैकी १५४९ कोवीड सेंटरमध्ये, १२७ डेडीकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये, ४८७ रुग्णांवर डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.







