अलिबाग तालुक्यात आज पुन्हा कोरोनाचे 13 नवीन रुग्ण सापडले

  • अलिबाग बाजारपेठ, श्रीबाग नं.2, सारळ, चोरगुंडी-पोयनाड, चेंढरे, शहाबाज, बोडणी येथील रुग्णांचा समावेश,
  • बाधित रुग्णांची संख्या 431 वर,
  • कोरोनाचे वाढते रुग्ण व लॉक डाऊन बाबत स्वागत तर काही जणांचा संताप

अलिबाग-सोगावकर: अलिबाग तालुक्यात आज कोरोनाचे 13 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये अलिबाग बाजारपेठ, सारळ, श्रीबाग नं. 2, चोरगुंडी-पोयनाड, चेंढरे, शहाबाज, बोडणी येथील रुग्णांचा समावेश आहे. आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 431 वर पोहोचली आहे.
तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, अलिबाग बाजारपेठेत तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. येथील 10 वर्षीय मुलगा, 90 वर्षीय वृद्ध व्यक्ती आणि 54 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. शहाबाज मध्ये 5 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यात चौकीचापाडा-शहाबाज येथील 65 वर्षीय वृद्ध, शहाबाज येथील 65 वर्षीय वृद्ध, 60 वर्षीय महिला आणि 44 वर्षीय आणि 38 वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.
बोडणी येथील 31 वर्षीय तरुणाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, चेंढरे वैभवनगर येथील वरुण सोसायटीतील 52 वर्षीय महिलेला, चोरगुंडी पोयनाड येथील 50 वर्षीय व्यक्तीला, श्रीबाग नं. 2 येथील मधुबन येथे राहणार्‍या 39 वर्षीय व्यक्तीला आणि सारळ दत्तनगर येथील एका 42 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.
आज श्रीबाग नं. 2 येथील 50 वर्षीय व्यक्ती कोरोना मुक्त झाल्याने या रुग्णाला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 431 वर पोहोचली आहे. यापैकी 200 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 221 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे तहसीलदार शेजाळ यांनी सांगितले.
दरम्यान आज 15 जुलै च्या मध्यरात्री पासून 26 जुलै च्या मध्यरात्री पर्यंत रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे,या निर्णयामुळे सर्व सामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे,तर काही नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे
आम्ही या कोरोनाचे चिंताजनक वाढते रुग्ण व जाहीर करण्यात आलेला लॉकडाऊन याबद्दल काही ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिकांच्या प्रतिक्रिया घेतल्या,त्या पुढील प्रमाणे,

कोरोना हे एक जागतिक संकट आहे,त्याच्याशी सर्वांनी एकजुटीने लढले पाहिजे.सरकारच्या प्रयत्नांना आपण सर्वांनी साथ दिली पाहिजे, जरा जरी शंका आली तर लगेच संबधित डॉक्टरांना भेटून खात्री करून घ्यावी.काही जण घाबरतात,असे दिसते.तसे न घाबरता योग्य काळजी घेतल्यास आपण सुरक्षित राहू शकतो.
केशव चांदोरकर-मो. सर-बहिरोळे-अलिबाग.

‘कोरोना’ लॉकडाऊन निरुपयोगी आहे,कारण त्यांनी कोरोना जाणार नाही, रुग्णांच्या प्रमाणात तात्पुरती घट होईल. कोरोना संसर्ग कसा होतो ते जनतेने समजून घेतले पाहिजे, व तसे राहायला शिकले पाहिजे,मात्र त्याचा नको तेवढा बाऊ सगळे करीत आहेत. लॉकडाऊनमुळे होणारे तोटे, नुकसान, बेकारी,याच भीषण परिणाम भविष्यात करेल !
लॉकडाऊन हे गोरगरिबांसाठी नॉकडाऊन आहे,हे शासनास कधी समजणार??
प्रसाद जोग, (अध्यक्ष, अलिबाग वेलफेअर ट्रस्ट-अलिबाग)

‘कोरोना’ सर्वांसमोर उभे राहिलेले एक महाभयंकर संकट आहे. ज्याच्यामुळे संपूर्ण माणसाची, गावांची, राज्यांची एवढेच नव्हे तर संपूर्ण जगाची घडी विस्कटली गेली.असा हा कोरोना प्रत्येक गावात, तालुक्यात, राज्यात पोहोचला आहे. कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या कोरोनाला हरविण्यासाठी आपण सर्वांनी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. दुसऱ्यांना सांगण्यापेक्षा आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. प्रत्येक वेळोवेळी मास्क, सॅनिटायझर(syanitizhar) वापरून आपण आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊ शकतो. घाबरून न जाता योग्य ती खबरदारी घेऊन आलेल्या संकटाना सामोरे गेले पाहिजे. 3 महिने घरात बसून कामधंदा नसल्यामुळे खायचे काय या विचाराने माणसे घाबरून गेली आहेत. त्यांना प्रशासनाने मदत केली पाहिजे. चला आता सर्वांनी घरातच राहून कोरोनाशी लढा देऊ या आणि कोरोनाला हरवूया.
गृहिणी सौ. साक्षी संदेश करमेले, सातीर्जे- कातळ पाडा,अलिबाग.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here