रत्नागिरी (प्रतिनिधी) – नाणीज येथील इरमलवाडी फाटा येथे रत्नागिरी-लातूर एसटीची बसची समोरासमोर धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात बस चालक-वाहकासह 13 प्रवासी जखमी झाले आहेत.
रत्नागिरी -लातूर बस क्र. एम.एच.20 बीएल 1254 ही गाडी आज सकाळी पावणे नऊ वाजता इरमलवाडी फाटा जवळ आली असताना समोरून येणाऱ्या ट्रकला क्र. एमएच 13 सीयू 4575 यांच्यात धडक झाली. धडक बसताच एसटी डाव्या बाजूला पलटली. एसटीतील 13 जण जखमी झाले. जखमींना नरेंद्र महाराज संस्थानच्या रूग्णवाहिकेतून जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.







