यावर्षीचा पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार ज्येष्ठ गायक पं. राजा काळे यांना जाहीर

pandit-raja-kale

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – ध्या कोरोना परिस्थिती सुधारत असल्याकारणाने मनोरंजनसृष्टीत उत्साहाचे वातावरण आहे. तसेच पुरस्कार सोहळ्यांचेदेखील आयोजन केले जाऊ लागले आहे, काही ‘इन-पर्सन’ तर काही ‘व्हर्च्युअल’ पद्धतीने हे सोहळे आयोजित होत आहेत. त्याचप्रमाणे गौड सारस्वत ब्राम्हण (जीएसबी) सभा मुलुंड या संस्थेनं मुंबई फोरम ऑफ आर्टिस्टच्या सहकार्यानं ७ फेब्रुवारीला पं. भीमसेन जोशी स्मृती समारोह आयोजित केला आहे. पं. राजा काळे यांना पं. भीमसेन जोशी स्मृती पुरस्कार २०२१ या महोत्सवात प्रदान करण्यात येणार आहे. याकार्यक्रमात पंडीत राजाकाळे यांच्यासह संगीत क्षेत्रातील मान्यवर कलाकारांचा या महोत्सवात सहभाग असणार आहे.

जीएसबी सभा मुलुंड या संस्थेतर्फे मुंबई फोरम ऑफ आर्टिस्ट यांच्या सहकार्याने दरवर्षी हा महोत्सव आयोजित करण्यात येतो. २०२१-२२ हे स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने या महोत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाच्या महोत्सवात ज्येष्ठ गायक पं. राजा काळे, गिटारवादक अभिषेक प्रभू, तबलावादक मंदार पुराणिक, विघ्नेश कामत, हार्मोनियमवादक अनंत जोशी, पखवाजवादक हनुमंत रावडे, मंजिरावादक अनिल पै, तानपुरा आणि गायक सहायक श्याम जोशी आणि अमृता काळे यांचा सहभाग आहे. श्रुती रानडे कार्यक्रमाचं सूत्रसंचालक करणार आहेत.

कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण संध्याकाळी ५. ३० ते ८.३० या वेळेत होणार आहे. त्यामुळे संगीतप्रेमींना घरबसल्या दर्जेदार संगीताचा आस्वाद घेता येणार आहे. तसेच ‘व्हर्च्युअली’ हा कार्यक्रम पाहता येणार असल्याची माहिती संस्थेचे सरचिटणीस गणेश राव यांनी दिली. ७ फेब्रुवारीला सायंकाळी साडेपाच वाजता मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम रंगणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here