सीबीएसई 10वी आणि 12वीच्या परिक्षांचे वेळापत्रक जाहीर

cbse-exam

नवी दिल्ली – कोरोना महामारीमुळे लांबणीवर पडलेल्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर झालं आहे. 10वी आणि 12वीच्या परीक्षा 4 मेपासून सुरू होणार आहेत. 10 जून 2021 पर्यंत या परीक्षा सुरू राहतील.

या दोन्ही परीक्षांचे वेळापत्रक केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विटरद्वारे जाहीर केले आहे. तसेच सीबीएसई (सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन) या संस्थेच्या cbse.gov.in आणि cbseacademic.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक पाहावयास मिळेल. प्रात्यक्षिकांच्या परीक्षा 1 मार्च 2021 पासून सुरू होतील. सर्व परीक्षांचे निकाल 15 जुलै 2021 पर्यंत जाहीर होतील.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here