क्रीडा भारती ठाणे शहर आयोजित भारत सरकारच्या महिला सक्षमिकरण कार्यक्रमाअंतर्गत उपक्रम
ठाणे (विशेष प्रतिनिधी सुभाष शांताराम जैन) – क्रीडा भारती ठाणे शहर आयोजित भारत सरकारच्या महिला सक्षमिकरण कार्यक्रमाअंतर्गत मुली व महिलांसाठी लाठी काठी प्रशिक्षण कार्यक्रम थाटात संपन्न झाला.
या उपक्रमाला महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन ८० हुन अधिक महिलांनी प्रतिसाद नोंदवला .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीमती रोहिणी डोंबे यांनी केले . तर प्रास्ताविक मनिष नाखवा (ठाणे शहर मंत्री )यांनी केले .कार्यक्रमात क्रीडा क्षेत्रातील नामवंत मान्यवर उपस्थित होते.प्रसिद्ध वैद्य डॉ. विनय वेलणकर यांनी अध्यक्षपद भुषविले.
श्रीराम व्यायाम शाळेचे विश्वस्त महेष भास्कर जोशी ,श्रीमती भारतीताई गणपुले सदस्या आखिल भारतिय क्रीडा भारती कार्यकारणी शिवछत्रपति पुरस्कार विजेत्या श्रीमती मनिषाताई डांगे श्रीकांत धर्माधिकार (क्रीडा भारती कोकण प्रांत)प्रशिक्षक बाळा साठे उपस्थित होते.
महेश भास्कर जोशी ह्यांनी ह्या उपक्रमाचे कौतुक केले.अध्यक्षीय भाषणात डॉ.विनय वेलणकर ह्यांनी व्यायामाचे महत्व समजाउन सांगितले. बाळा साठे ह्यांच्या चमुने प्रात्यक्षिके सादर केली .अनंत आगरकर ह्या़ंनी आभार प्रदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.तरे , सतीश ठाणेकर , राजेंद्र गोसावी ,गिरीश पुराणिक यांचे विशेष योगदान लाभले.







