मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. अनिल देशमुख यांनी स्वत: याबाबत ट्विट करून माहिती दिली आहे. देशमुख यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले असून त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईन, असे ट्विट अनिल देशमुख यांनी केले आहे.







