पालघरमध्ये अकरा मुलांना जेवणातून विषबाधा

palghar-news

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – पालघरमध्ये तब्बल अकरा मुलांना जेवणातून विषबाधा झाली आहे. सर्व मुलांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

पालघरच्या किरत गावात एका लग्नात 11 मुलांना विषबाधा झाली. सर्व मुले 5 ते 12 वयोगटातील आहेत. जेवल्यानंतर अकरा मुलांना उल्टी आणि मळमळ होण्यास सुरूवात झाली. त्यांची तब्येत बिघडल्यानंतर तत्काळ सोमता प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून जेवणाचे नमूने चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here