मुंबईत चिमुकल्याची हत्या करून आईची आत्महत्या

mumbai-local-train-sucide

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) – वर्षभराच्या बाळाची हत्या करून नंतर धावत्या लोकलमधून वाशी खाडीपुलावरुन मुलासह स्वत:ला झोकून देऊन आत्महत्या केली. या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. दरम्यान, ही महिला चेंबूर येथील असल्याचे सांगण्यात येत आहे.

चेंबूर येथे राहाणाऱ्या एका 31 वर्षीय विवाहितेने आपल्या एक वर्षीय मुलाचा गळा चिरला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मुलाच्या मृतदेहासह धावत्या लोकलमधून वाशी पुलावरुन उडी टाकुन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. मानसिक संतुलन बिघडल्याने या महिलेने हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. वाशी रेल्वे पोलिसांनी या महिलेवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

या घटनेतील मृत विवाहिता ही पती व कुटुंबियासह चेंबूर येथे राहाण्यास असली तरी मागील दीड दोन वर्षांपासून ती आपल्या माहेरी पुणे येथे राहात होती. त्यानंतर वर्षभरापूर्वी तिला मुलगा झाला होता. शनिवारी 6 फेब्रुवारी रोजी मुलाचा वाढदिवस असल्याने या विवाहितेची आई साहित्य आणण्यासाठी बाजारात गेली होती. यावेळी ही महिला कोणालाही न सांगता मुलाला घेऊन मुंबईला निघाली होती. परंतु रात्री दहाची मुंबईहुन पनवेल लोकल पकडली आणि वाशी खाडी पूल येताच तिने उडी मारली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here