आपल्या गावाचा विकास आणि सेवेकडे लक्ष ठेवा – अशोक मोटे

panvel-news
फोटो-(विकास रणपिसे)-माथाडी नेते नामदेव कटारे यांचा सन्मान करतांना भाजपा जिल्हा चिटणीस अशोक मोटे,सोबत रायगड भूषण जयपाल पाटील,सदाशिव खताल-शिक्षणाधिकारी

पनवेल-सोगावकर – आपल्या तिनवडे-आटपाडी गावातील नामदेव कटारे,माथाडीचे नेते समाज सेवक व माथाडी कामगार संघटना पतसंस्थेचे चेअरमनपदी नियुक्ती झाली हे आम्हा तरुणांना अभिमानास्पद आहे.गावाकडील माणसांनी संकटाच्या वेळी एकत्र आले पाहिजे व तरुणांना अहिल्यादेवी फंडा प्रमाणे मदत करावी, असे तक्का येथील हनुमान मंदिर सभागृहात आयोजित समारंभात अशोक मोटे यांनी सांगितले.

अहिल्यादेवी फंड निबवडे ता.आटपाटी जिल्हा सांगली यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रम व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अशोक मोटे,कार्यक्रमाचे अध्यक्ष रायगड भूषण जयपाल पाटील,सदाशिव खताल,सुरेश जाधव,अनिल चिंबुलकर ,अंगदराव बंडगर उपस्थित होते.

प्रारंभी मान्यवरांना फेटा व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला.जालंदर मोटे यांनी पनवेलमध्ये कामानिमित्त आलेल्यानी 11 वर्षापूर्वी अहिल्यादेवी फंड स्थापन करून गरजूंना उद्योग आणि शिक्षणासाठी मदत केली जाते.

यावेळी सत्कार मूर्ती माथाडी नेते नामदेव कटारे म्हणाले की 1985 साली मी राष्ट्रीय केमिकल आणि फर्टिलायझर थळ-अलिबाग येथे कामानिमित्त येऊन मा.मनोहर कोतवाल यांच्या कामगार संघटनेमध्ये आजपर्यंत कार्यरत आहे.कामगारांचे प्रश्न सोडवत संघटनेत उपाध्यक्ष पदा पर्यंत व आज 230 कोटीच्या पतसंस्थेचे चेअरमन पदी निवड झाल्याने माझा सत्कार केलात,त्याबद्दल फंड सदस्य यांचा आभारी आहे,माझे शिक्षण कमी असले तरी कामगार अभ्यास दौऱ्यात युरोप, ऑस्ट्रेलिया येथे जाऊन आलो,माझ्या माथाडी बांधवाना घर,फ्लॅट घेण्यासाठी केव्हाही कर्ज मागणी करावी,आपल्या समाजासाठी कायमची सेवा देईन,असे त्यानी सांगितले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अशोक मोटे,सदाशिव खताल,सुरेश जाधव यांचे मार्गदर्शन झाले तर कार्यक्रम अध्यक्ष रायगड भूषण जयपाल पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन आपली व कुटूंबाची सुरक्षित काळजी कशी घ्यावी याची माहिती दिली.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी दत्ताराम,नामदेव,मोहनदादा,तातोबा मोटे,मधुकर खताल यांनी परीश्रम घेतले,आभार श्रीकांत खताल यांनी मानले.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here