सिलिंडर स्फोटाने मीरा रोडचे रामनगर हादरले, एक जण जखमी

cylinder-blast

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) – मीरा रोड पूर्वेतील रामनगर येथे सेंट पॉल शाळेच्या शेजारी, सुरभी जीम समोर मोकळ्या मैदानात उभ्या असलेल्या एक टेम्पोतील घरगुती गॅस सिलिंडरचा मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास स्फोट झाला.  त्यामुळे बाजूला पार्क केलेल्या MH 04 GR 0893 या पिकअप वाहनाला देखील आग लागली.

एकापाठोपाठ अनेक स्फोट झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. अग्निशमन दलाच्या जवानांकडून पहाटे 05:00 वाजताच्या सुमारास ही आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे.

या घटनेत स्थानिक रहिवासी केतन सोलंकी (25 वर्षे) यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी भक्ती वेदांत रुग्णालय, मीरा रोड येथे दाखल केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here