घरपट्टीत पन्नास टक्के कपात करावी; महापालिका आयुक्तांना निवेदन

जळगाव (निलेश पाटील) – येथील शिवरत्न प्रतिष्ठान व जनमत प्रतिष्ठान यांच्यातर्फे लॉकडाऊनच्या काळात घरपट्टीमध्ये पन्नास टक्के कपात करुन, सर्वसामान्यांवर पडलेला आर्थिक ताण दूर करण्यासाठी महापालिकेच्या इतिहासातील ऐतिहासिक पाऊल टाकून, इतिहास घडवावा अशी मागणी करणारे निवेदन देण्यात आले.
तसेच यावेळी निवृत्ती नगरमधील क्वॉरटाइन सेंटरच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत चर्चा केल्यानंतर महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांना सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी शिवरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल पाटील, जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here