जळगाव (प्रतिनिधी) – जिल्ह्यात कोरोना तपासणीसाठी स्वॅब घेतलेल्या कोरोना संशयित रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून, त्यात जिल्ह्यातील ३१६ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. दरम्यान २२७ रुग्ण आज बरे झाले आहेत.
कोरोना बाधित आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ७८ (१५RATI), भुसावळ ४४, अमळनेर १५, चोपडा ७ (RATI 1), पाचोरा ६, भडगाव १, धरणगाव १४, यावल ४, एरंडोल २६, जामनेर १६ (RATI १), जळगाव ग्रामीण १९ (RATI १), रावेर २० (RATI३), पारोळा ३, चाळीसगाव १५, मुक्ताईनगर १६ (RATI 9), बोदवड १ असे ३१६ कोरोना बाधित रुग्ण आहेत. आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या एकूण ६९७० झाली असन, आज ६ रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकूण मृत रुग्णांची संख्या ३५८ झाली आहे.







