सांगली (स्वप्निल कारेकर) – बहुजन परीवर्तन प्र महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या नेतृत्वाखाली, सांगली जिल्हा युवा “कार्याध्यक्ष” आकाश शांताराम तुपे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथील राहिवासी असणारे आकाश युवा कार्यकर्ता आहेत. समाजसेवा युवा कार्यकर्ता कोरोना संकट आसताना आकाश यांनी आपला जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करत होते कोरोना संकटकाळी लोकांची मदतीचा हात पुढे करून यांना आरोग्य योजनेची माहिती देत होते .आशा महान युवा सांगली जिल्हा कार्याध्यक्ष पद साहेब बाजीराव सदाशिव नाईक यांनी आकाश शांताराम तुपे यांची बिनविरोध निवड झाली याबद्दल
पश्चिम महाराष्ट्र युवा संपर्क प्रमुख मेहुल आंबवडे यांनी पुढाकार घेऊन, सांगली जिल्हा युवा कार्याध्यक्षपदी नियुक्तीचे पत्र बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि संस्थापक अध्यक्ष बाजीराव सदाशिव नाईक यांच्या हस्ते देण्यात येणार आहे . बहुजन परीवर्तन पार्टी प्रणित महाराष्ट्र राज्य महिला बचाव समिती रजि महाराष्ट्र राज्य सचिव राजेंद्र सोनवणे यांच्या वतीने व समाजातील सर्वस्तरातून आकाश तुपे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.







