पुणे (प्रतिनिधी) – कोरोनाच्या काळात महाराष्ट्रातील सर्वच विभागातील कलाकारांना वस्तू स्वरुपात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार यांनी मदत केली होती, त्या अनुषंगानेच पुण्यातील मराठी नाट्य निर्माता संघाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त म्हणून खा.पवार यांच्याकडे पुणे शहरातील नाट्यनिर्माते, लावणी निर्माते, बॅक स्टेज कलाकार, कलाकार आणि तंत्रज्ञ यांना मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
पुणे शहरात ३२ नाट्य आणि लावणी निर्माते, ७५ बॅक स्टेज कलाकार आणि ३५० कलाकार व तंत्रज्ञ यांची कोरोना लॉकडाऊन दरम्यान आर्थिक परिस्थिती बिकट झाली असून, त्यांना कोणत्याही प्रकारची मदत अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखा मुंबई यांच्याकडून मिळालेली नाही.. त्यामुळे त्यांनी आता आपले साकडे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती शाखेचे विश्वस्त म्हणून खा.शरद पवार यांना निवेदन देवून साकडे घातले आहे. या निवेदनावर मराठी नाट्य निर्माता संघाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांची स्वाक्षरी आहे.
Home Uncategorized पुणे शहरातील नाट्यनिर्माते, लावणी निर्माते, कलाकार आणि तंत्रज्ञांना मदत मिळण्याची नाट्य निर्माता...







