शहादा (विजय पाटील) – सीबीएसई बोर्डाद्वारे शैक्षणिक वर्ष २०१९ – २० साठी मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १० वी च्या परिक्षेत शहादा शहरातील नामांकित श्री महावीर इंग्लिश मिडीयम स्कूलचा १०० टक्के निकाल लागला असून, सर्व विद्यार्थ्यांनी दैदीप्यमान यश संपादन केले आहे. श्री महावीर स्कूलचा १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम राखली आहे. शाळेतील एकूण १२९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. हे सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले असून, त्यातील १८ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी तर ३४ विद्यार्थी ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी आणि ३१ विद्यार्थी ७० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून यशस्वी झाले आहेत.
९० टक्क्यांपेक्षा जास्त गुणांनी सिध्दार्थ जोशी (९७.३३), स्नेहा जैन (९७.१७), आदर्श चौधरी (९६), साक्षी जैन (९३.६७), उदित जैन (९३.६७), रोहन पाटील (९३.५०), नम्रता जैन (९२.१७), मयुर पाटील (९२), नुपूर चौधरी (९१.६७), ओम निकम (९१.१७), प्राची चौधरी (९०.८३) हर्षित जैन (९०.८३), रिया जैन (९०.६७), समी हसमानी (९०.६७) या सर्व यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचे श्री महावीर इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष रमेशचंदजी चोरडिया, उपाध्यक्ष विनयजी गांधी, सचिव पारसजी देसर्डा, शाळेच्या विश्वस्त मंडळातील सदस्य अनिलजी छाजेड, हेमलजी गांधी, चंदनमलजी जैन, समीरजी जैन, शाळेचे मुख्याध्यापक ए.एम.पाटील, उपमुख्याध्यापक किशोर चौधरी, तसेच शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.










