बदलापूर मध्ये ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु चित्रपटांचा धुमधडाक्यात मुहूर्त सोहळा संपन्न

film-subharambh-at-badalapur

बदलापूर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर) – बदलापूर हेंद्रे पाडा, अंजली नगर सोसायटी येथे शनिवार दिनांक ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता डोंबिवली मधिल प्रख्यात समाजसेवक राजेश विनायक कदम (चार्टर प्रेसिडेंट ऑफ रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड) यांच्या हस्ते आर्यारवी एंटरटेनमेंट प्रस्तुत- महेश तेटांबे लिखित आणि दिग्दर्शित ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु चित्रपटांच्या मुहूर्ताचा नारळ फोडण्यात आला.

shubharambha

shootingयाप्रसंगी जनजागृती सेवा समितीचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, समाजसेवक दत्ता कडुलकर, कार्यकारी दिग्दर्शक राम माळी, तेजस माळी, छायाचित्रकार-संकलक सुनिल म्हात्रे, वर्षा म्हात्रे, प्रकाशयोजनाकार नवीन, लेखक-दिग्दर्शक अनंत सुतार, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, दिपंती दिनेश साळवी, अक्षदा मोरे, गंधाली तिरपणकर, नेहा कदम, अभिनेता सुरेश डाळे पाटील, संदीप जाधव, यशवंत मुसळे, रवीना सोनावणे, बालकलाकार आर्य तेटांबे, नैतिक कदम, मधुरा म्हात्रे आदी कलावंत तंत्रज्ञ उपस्थित होते.

777-rs-babashooting-1

याप्रसंगी या दोन्ही लघु चित्रपटांतील काही भावुक दृश्याचे चित्रीकरण करण्यात आले. अशा तऱ्हेने सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत ७७७ रुपयांत बाबा आणि शिदोरी या दोन लघु चित्रपटांचा धुमधडाक्यात मुहूर्त सोहळा संपन्न करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here