ऑफ्रोह संघटनेचा राज्यस्तरीय महामेळावा १४ ला नागपुरात

ofroh

नागपूर (प्रतिनिधी) – ऑर्गनायझेशन फॉर राईट्स ऑफ ह्यूमन; महाराष्ट्र या कर्मचारी संघटनेचा महामेळावा दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोज रविवारला दुपारी २ वाजता नागपूर येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्याध्यक्ष शिवानंद सहारकर राहणार आहे. ऑफ्रोह संघटनेचा प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून सदर राज्य महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याकरिता महाराष्ट्रातील नागपूर,भंडारा,गडचिरोली,गोंदिया,वर्धा,यवतमाळ,चंद्रपूर,वाशिम,अमरावती,अकोला,बुलढाणा,जालना,नाशिक,अहमदनगर,पुणे,कोल्हापूर,सातारा,सांगली,उस्मानाबाद,सोलापूर,जळगाव,बीड,हिंगोली,लातूर,परभणी,नांदेड,रत्नागिरी,रायगड,मुंबई,ठाणे इ. जिल्ह्यातून मोठया प्रमाणात कर्मचारी बांधव उपस्थित राहणार आहे.

मेळाव्यात नानभाऊ पटोले नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष,काँग्रेस कमिटी यांचा सत्कार करण्यात येईल. कार्यक्रमाचे उदघाटक मा. नामदार डॉ. नितीन राऊत ऊर्जामंत्री व प्रमुख अतिथी मा. नामदार अनिल देशमुख गृहमंत्री, मा.नामदार हसन मुश्रीफ ग्रामविकास मंत्री,मा.नामदार विजय वडेट्टीवार पुर्नवसन मंत्री, मा.नामदार सुनील केदार दुग्ध विकास मंत्री,मा.नामदार यशोमती ठाकूर महिला व बालकल्याण मंत्री,मा.नामदार संजय राठोड वनमंत्री मा.नामदार सतेज उर्फ बंटी पाटील गृह राज्यमंत्री,मा.नामदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू शालेय शिक्षण राज्यमंत्री,मा.नामदार विश्वजित कदम सहकार राज्यमंत्री,मा.आम.विकास ठाकरे नागपूर शहर अध्यक्ष काँग्रेस कमिटी हे मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. मा.आम.राजू पारवे हे स्वागताध्यक्ष आहेत.

मेळाव्यात कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यास मंत्री महोदयास करण्यात येईल.अधिसंख्य कर्मचाऱ्यांना वेतनवाढ; आश्वासीत प्रगती योजना देण्यात यावी. 11महिण्याकरिता तात्पुरते दिलेले आदेश रद्द करून सेवानिवृत्त होईपर्यत त्याना आदेश द्यावे.अधिसंख्य सेवानिवृत्त कर्मचारी व मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारांना ग्रॅजुईटी,रजेचे रोखीकरण,पेन्शन त्वरित देण्यात यावे.अधिसंख्य मृत कर्मचाऱ्यांच्या वारसदारास अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घ्यावे.शासन निर्णय दि.२१/१२/२०१९ मधील मुद्दा क्र.२ ची सर्व विभागात अंमलबजावणी करण्यात यावी व मुद्दा क्र. ४.१ रद्द करण्यात यावा इ.मागण्यास कर्मचाऱ्यांचा प्रलंबित समस्या सोडविण्यासाठी याव्यात.

आपल्या जिल्ह्यातील जास्तीत जास्त अधिकारी; कर्मचाऱ्यांनी मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन आफ्रोह संघटनेचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सतीश कोळी,बालाजी पुपले(सचिव),शंकर लाड(कार्याध्यक्ष),राजमंहमद शेख(संपर्क प्रमुख),कल्पना गुमटे,संजय बारवटकर,सविता भगत,एकनाथ परसे,यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here