आज अलिबाग तालुक्यात पुन्हा कोरोनाचा विस्फोट,50 नवीन रुग्ण,तर 3जणांचा मृत्यू

  • कोरोना बाधित रुग्णांची संख्या पोहोचली 481 वर,
  • तालुक्यात कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्याचे सर्वांसमोर आव्हान,

अलिबाग-सोगावकर – अलिबाग तालुक्यात आज कोरोनाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ झाली आहे,तब्बल 50 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, यापैकी दोन रुग्णांसह एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. इतक्या मोठ्या संख्येने पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आल्याने अलिबागकर चिंतेत पडले आहेत. आजअखेर तालुक्यात बाधित रुग्णांची संख्या 481 झाली असून कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहेत.
तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (16 जुलै) विद्यानगर ज्वेल्स ऑफ अलिबाग येथील 25 वर्षीय तरुण, वरसोली येथील ओमकार फे्ंरड्स सर्कलजवळील 56 वर्षीय महिला, शहाबाज नुक्कड गल्ली येथील 60 वर्षीय वृद्ध, वरसोली आयईएस शाळेजवळ राहणार्‍या 66 वर्षीय महिला, वेश्‍वी संतोषी माता मंदीरजवळील 34 वर्षीय महिला यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

पिंपळभाट येथील स्वामी समर्थ मंदीरजवळील 25 वर्षीय तरुणाला कोरोना झाला आहे. अलिबाग शहरातील ब्राह्मणआळी कन्या शाळा परिसरातील 52 वर्षीय व्यक्तीला, शहाबाज वालवडे येथील 23 वर्षीय तरुणीला, चोरगुंडी येथील 53 वर्षीय व्यक्तीला, चेंढरेतील कृष्णवंदन सीएचएस येथील 56 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. किहीम ग्रामपंचायतजवळ दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये 30 वर्षीय पुरुष व 24 वर्षीय महिला अशा दोघांचा समावेश आहे. उसर येथील 31 वर्षीय तरुणी, रामनाथमधील संत गोरोबा कुंभार मंदिराजवळील कुंभारवाडीत राहणार्‍या 38 वर्षीय व्यक्तीला, अलिबाग पोलीस ठाण्याजवळील 32 वर्षीय व्यक्ती कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे,, विद्यानगर फायर ब्रिगेड कोर्ट येथील 35 वर्षीय व्यक्तीला, चेंढरे शिवाजी नगर येथील 24 वर्षीय तरुणाला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

पेझारी श्री सौरभ अपार्टमेंट येथे तीन रुग्णांची नोंद झाली आहे. येथील 47 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला आणि 14 वर्षांच्या मुलाला कोरोना लागण झाली आहे. रामनाथमधील श्रीकृपा निवास येथील 73 वर्षीय वृद्ध व्यक्तीला तर पवेळे येथे 45 वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पोलीस हेड कॉटर्स येथील 46 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पिंपळभाट येथील सुजलाम नगर-2 येथे दोन रुग्णांची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. येथील 48 वर्षीय महिला व 23 वर्षीय तरुण अशा दोघांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. मुळे येथील 51 वर्षीय महिला आणि 31 वर्षीय पुरुष अशा दोघांना कोरोना झाला आहे. विद्यानगर वरसोली भाट येथील 43 वर्षीय व्यक्ती, नेहुली येथील 56 वर्षीय पुरुष यांना कोरोनाची लागण झाली आहे,

अलिबाग शहरातील मेटपाडा येथील शीतलधारा सोसायटीत राहणार्‍या 34 वर्षीय महिलेला कोरोना झाला आहे. चौल तुलाडदेवी मंदिराजवळील 37 वर्षीय व्यक्तीला, शहाबाज हनुमान मंदिरजवळ राहणार्‍या 72 वर्षीय महिलेला कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मोठे शहापूर येथे तीन रुग्णांना कोरोना झालाआहे. येथील 74 वर्षीय वृद्ध, 6 वर्षांची मुलगी आणि 80 वर्षीय वृद्ध महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे, अलिबाग बे वूड सोसायटी येथील 24 वर्षीय तरुण, मांडवा जेट्टी कोळगांव येथील 53 वर्षीय महिला, अलिबाग कस्टम बंदर विभाग येथील 48 वर्षीय व्यक्तीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे.

थेरोंडा-पिरांचे देऊळ येथील 67 वर्षीय वृद्धाला कोरोना झाला आहे. तर बोडणी येथे 9 जणांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. यामध्ये 35 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय दोन महिला, 32 वर्षीय पुरुष, 39 वर्षीय दोन पुरुष, 70 वर्षीय वृद्ध, 34 आणि 35 वर्षीय दोन महिलांचा समावेश आहे.

याव्यतिरिक्त अलिबाग शहरातील घरत आळी येथील 70 वर्षीय महिला व चिंचवली फोफेरी येथील 40 वर्षीय व्यक्ती यांचा मृत्यू झाला होता. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. याव्यतिरिक्त नवेनगर कुरुळ येथील 78 वर्षीय रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज तीन रुग्णांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. वाघोलीवाडी-कामार्ले येथील 21 वर्षीय तरुण, शिवाजी नगर चेंढरे येथील 25 वर्षीय तरुण आणि फुफादेवीपाडा रेवस येथील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिक असे तीन रुग्ण उपचारानंतर बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. दरम्यान, आजअखेर तालुक्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 481 वर पोहोचली आहे. यापैकी 203 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत 265 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
आजच्या घडीला आलेला कोरोनाचे संकट व संकटात आलेला दुष्काळात तेरावा प्रमाणे लॉकडाऊन,याबाबत आम्ही पुन्हा एकदा नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, त्या पुढील प्रमाणे,

कोविड रुग्णांमध्ये होणारी वाढ थांबविणे हे प्रत्येक माणसा कडून झाले पाहिजे, जसे सोशल डिस्टनसिंग, सॅनिटायझेशन- ही आपली स्वतः ची जबाबदारी आहे.
वाढलेला लॉकडाऊन – लॉकडाउन यशस्वी होण्यासाठी, सरसकट सगळच बंद ठेवा. जर कोरोना ची साखळी तोडायची असेल तर, जागतिक महायुद्धाच्या वेळे सारखी पद्धत वापरावी- सील द डोअर. एकदाच कडक लॉकडाउन आणि लोकांनी स्वतः जागरूकता दाखवली तर कोविड १९ बऱ्यापैकी आटोक्यात येऊ शकतो.
अपर्णा नविन पडवळ, वकील, अलिबाग

कोरोनाच्या व्हायरसचा प्रादुर्भाव आता ग्रामीण भागात खास करून, सर्वार्थाने सुरक्षित अश्या आपल्या अलिबाग तालुक्यात दाखल झाला आहे, म्हणून प्रत्येकाने स्वतःच स्वतःचे रक्षक बनुन शासनाने दिलेले सुरक्षेचे नियम पाळावेत,आजाराला प्रतिबंध करण्यासाठी सात्विक आहार,पावसाळ्यातील पौष्टिक भाज्या,व आयुष्य मंत्रालयाने शिफारस केलेल्या काढ्याचे सेवन करा,त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होईल, येणारे 3/4 महिने फार कठीण व आव्हानात्मक आहेत, काळजी घेतल्यास आपण आपला बचाव करू शकतो. आजपासून सुरू झालेला लॉकडाऊनचा निश्चित चांगला फायदा होईल, व मागील15/20 दिवसात वाढलेले कोरोनाचे प्रमाण कमी होईल.
चंद्रकांत मोकल,हाशिवरे-अलिबाग
को.चेयरमन, कृषी कमिटी, महाराष्ट्र, चेंबर ऑफ कॉमर्स,

शक्यतो कामाशिवाय बाहेर पडू नये,आणि जर बाहेर पडण्याची गरज असेलच तर तोंडाला मास्क लावायचं,आणि बाहेर पडायचे, पण शक्यतो आपण काय करायचं की,शासनाने जे काही सांगितले आहे की कामाव्यतिरिक्त बाहेर पडू नका,मला तर हे वाटत की हे नियम आपण पाळायला पाहिजे,काम नसेल तर बाहेर पडणे चुकीचे आहे, बाहेर पडू नये, आपण घरात राहील पाहिजे, त्याच्यामुळे काय होईल की, जो कोरोनाच संसर्ग होतो तो होणार नाही, आणि आपण सगळे सुरक्षित राहू,कारण सध्या बाहेर कामाव्यतिरिक्त न पडणे,हे फार महत्त्वाचे आहे, असे मला तरी वाटतं, आणि बाहेर पडलोच तर मास्क लावणं, सोशल डिस्टसिंगचे नियम पाळले पाहिजे,कारण कोरोनाच प्रसार वाढत चालला आहे, म्हणून शक्यतो आपण घरीच राहिले पाहिजे, व कोरोनाला हरवले पाहिजे, असे माझे मत आहे.
सर-सुभाष तुकाराम भोबू-वरसोली-अलिबाग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here