मोहम्मद या डिजिटल फिल्म वर बंदीची मुस्लिम समुदायाची मागणी

जळगाव (विशेष प्रतिनिधी) – इस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हजरत मोहम्मद(स) यांचे नावे मोहम्मद द मेसेंजर ऑफ गॉड ने नुकताच एक डिजिटल प्लॅटफॉर्म वरील फिल्म बनविण्यात आली असून तिचे प्रसारण लवकरच होत असल्याने त्या प्रसारणावर बंदी घालण्यात यावी या बाबतचे निवेदन मा पंतप्रधान साहेब व केंद्र सरकारच्या माहिती तंत्रज्ञान विभागाला मा जिल्हा अधिकारी जलगाव यांच्या मार्फत पाठविण्यात आले.
सदरचे निवेदन गृह विभागाचे डेप्युटी चिटणीस रवींद्र मोरे यांनी स्वीकारले व त्वरित ते शासनास पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले. सदर चे निवेदन महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी अल्पदांख्याक विभागाचे प्रदेश अध्यक्ष अब्दुल गफ्फार मलिक यांच्या नेतृत्वात दिले असून सोबत मुस्लिम पर्सनल लाँ चे शहर ए काझी मुफ्ती अतिकुर रहेमान,महा मानियार बिरदारीचे प्रदेश अध्यक्ष फारूक शेख,राष्ट्रवादि पक्षाचे प्रसिध्दी प्रमुख सलीम इनामदार, महानगर अध्यक्ष डॉ रिझवान खाटीक व मुस्लिम ईदगाह ट्रस्ट चे सह सचिव अनिस शाह उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य चे ग्रह मंत्री माननीय अनिल देशमुख साहेब यांनी ही केंद्रीय मानव संसाधन मंत्रालय ला एक पत्र पाठवून केंद्राला या प्रदर्शित होणाऱ्या चित्र पटा मुळे एका विशिष्ट समाज ची भावना दुखावली जाणार आहे म्हणून यावर बंदी आणावी अशी मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here