मुंबई, दि.१४ – जवळपास वर्षभरापासून जगभरात करोनाने धुमाकुळ घातलेला असताना, आता संपूर्ण जग व्हॅलेंटाईन डेसाजरा करण्याच्या तयारीत लागले आहे. सर्वजण भूतकाळ विसरुन आता आनंदी जीवन जगण्यासाठी सज्ज झाले आहेत. आपल्या प्रियजनांना प्रेमळ संदेश पाठवून हा प्रेमाचा दिवस अधिक खास बनवण्याची सर्वानी तयारी केली आहे. सोशल मिडियाच्या जमान्यात सर्वजण एकमेकांना व्हॉट्सअप, फेसबुक च्या माध्यमातून शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहेत. मात्र हे सर्व करत असताना या सर्व शुभेच्छांच्या मजकूरावर पोलीसांचे बारिक लक्ष असणार आहे. यातून काही चुकीचा संदेश समाजामध्ये तर जात नाही ना याकडे सुद्धा पोलीस लक्ष देत आहेत.
आता सोशल मिडीयामुळे व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याची पध्दत बदलत चालली आहे. यापुढे सुद्धा ही पध्दत आधुनिक होण्याची दाट शक्यता आहे. आज प्रत्येक गोष्ट व्यक्त करण्यासाठी इमोजींचा वापर केला जातो. तसा यादिवशी सुद्धा मोठ्याप्रमाणात इमोजींचा वापर होवू शकतो. मात्र तो करताना भान ठेवणे गरजेचे आहे. आपल्या मनातील भावना प्रामाणिकपणे व्यक्त करत, असताना कोणी दुखावला जाणार नाही याची काळजी घेणेसुद्धा गरजेचे आहे. त्यामुळे व्यक्त व्हा आणि आनंदी रहा.







