गल्लेबोरगाव येथे भीमाई व रमाई जयंती मोठया उत्साहात साजरी

ramai-jayanti-at-galleborgaon

बाजार सावंगी (प्रतिनिधी मूनीर शाह) – खुलताबाद तालुक्यातील गल्लेबोरगाव येथे माता भिमाई रामजी आंबेडकर यांची जयंती वसंता शिरसाट गल्ले बोरगावकर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष ,पिंपरी ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच अजित जाधव (पत्रकार मूनीर शाह)यांनी केक कापून साजरा केला.

कार्यक्रमाच्या सुरवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पिंपरी ग्रामपंचायतचे नवनिर्वा चित सरपंच शिल्पा अमित जाधव यांनी पुष्पहार अर्पण केले. व केक कापुन जयंती साजरी करण्यात आली.

bhimai-jayanti-at-galleborgaon

यावेळी वसंता शिरसाट गल्लेबोर गावकर यांनी भिमाई व रमाई आंबेडकर यांनी दयनिय अवस्थेत केलेल्या कार्याचा उजाळा दिला. महिलांनी सुद्धा या दोन्ही महान त्यागमूर्तीचा आदर्श घेऊन तो अमलांत आणावा असे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पिंप्रीचे नवनिर्वाचित सरपंच सौ. शिल्पा अमित जाधव त्याचे पती उपस्थित होते.तसेच सौ.लाडूबाई शिरसाट व उषाबाई शिरसाट यांनी सरपंच साडी ,शाल देऊन सत्कार केला. कोकिळाबाई शिरसाट,रसवंता बाई शिरसाट , रेश्माबाई शिरसाट, केसरबाई शिरसाट , सुमनबाई रेखाबाई शिरसाट, लक्ष्मीबाई शिरसाट, नंदाबाई शिरसाट, अनिताबाई शिरसाट, शिरसाट, मंगलबाई शिरसाट, लिलाबाई शिरसाट, अवसरमल बाई , भारती भोसले, सविता शिरसाट, वैशाली शिरसाट, सुभाष शिरसाट, दिनकर शिरसाट, महेंद्र भोसले, आदींनीही उपस्थित। राहुन अभिवादन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here