माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचं निधन

justic-p-b-sawant

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) – माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी सकाळी साडे नऊ वाजता अखेरचा श्वास घेतला.

पी. बी. सावंत यांनी मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी (एलएलबी) घेतली होती. त्यांनी मुंबई हायकोर्टात न्यायाधीश म्हणून काम पाहिलं होतं. अनेक ऐतिहासिक निकाल त्यांनी दिले होते. १९९५ मध्ये ते निवृत्त झाले होते.

यानंतरही त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये भाग घेतला गोता. वर्ल्ड प्रेस कौन्सिल आणि प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिलं होतं. ते पहिल्या एल्गार परिषदेचे अध्यक्ष होते. मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे ते अध्यक्ष होते. मंगळवारी सकाळी बाणेरमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here