जळगाव (संपादक सुनिल पाटील) यावलजवळ किनगाव येथे ट्रक उलटून 15 मजुरांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. या घटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदीही हेलावले आहेत. मराठी व इंग्रजीतून ट्वीट करत पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो. – पंतप्रधान @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 15, 2021
या भीषण अपघातात 15 मजुरांचा दुदैर्वी मृत्यू झाला आहे. धक्कादायक म्हणजे, यात एकाच कुटुंबातील 11 जणांचा समावेश आहे. यावल जवळील किनगावजवळ चालकाचा ताबा सुटल्यामुळे ट्रक उलटला. या ट्रकमध्ये पपई मोठ्या प्रमाणात भरलेली होती. ट्रक उलटल्यामुळे मागे बसलेले मजूर हे पपईच्या ढिगाराखाली सापडले असल्याची माहिती मिळत आहे. सर्व मजूर हे झोपलेले होते, त्यामुळे काही कळण्याच्या आता काळाने त्यांच्यावर झडप घातली.
मोदी यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले की, महाराष्ट्रातील जळगाव येथे हृदय हेलावून टाकणारा ट्रकचा अपघात घडला आहे. शोकाकुल कुटुंबांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा होवो, अशा शब्दात पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला आहे.
Heart-wrenching truck accident in Jalgaon, Maharashtra. Condolences to the bereaved families. May the injured recover at the earliest: PM @narendramodi
— PMO India (@PMOIndia) February 15, 2021







