एमएस धोनी सिनेमात काम करणारा अभिनेता संदीप नहारने केली आत्महत्या

sandeep-nahaar

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – ‘केसरी’ आणि ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ सारख्या चित्रपटात काम करणारा अभिनेता संदीप नहार याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. पोलिसांना यासंबंधी माहिती मिळता ते घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये त्याने आत्महत्या करण्यामागचं कारण सांगितलं आहे. याशिवाय संदीपने एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात तो वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अस्वस्थ होता असं सांगितलं.

संदीप नहार याने शेअर केलेल्या १० मिनिटांच्या व्हिडिओमध्ये म्हटले की, ‘मी तुम्हाला बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसलो असेन. मी एमएस धोनी सिनेमात छोटू भैय्याची भूमिका साकारली होती. आज हा व्हिडिओ बनवण्याचं एक उद्दीष्ट आहे. हेतू हा आहे की माझ्या आयुष्यात बर्‍याच समस्या चालू आहेत हा हेतू आहे. मी मानसिकदृष्ट्या स्थिर नाही. याला कारण माझी पत्नी कंचन शर्मा आहे. मी दीड- दोन वर्षांपासून एका मानसिक ताणात जगत आहे. मी बायकोला वारंवार समजावून सांगितलं. आमचं ३६५ दिवस भांडण होतं.’

‘ती म्हणते की ती आत्महत्या करेल आणि त्यात मला अडकवेल. मी पूरता वैतागून गेलो आहे. माझ्या कुटुंबाला शिवीगाळ करते. माझ्या आईला शिव्या देते. तिच्यासमोर मी घरच्यांचे फोनही उचलू शकत नाही. माझं नाव कोणाशीही जोडते. ती नेहमीच माझ्यावर संशय घेते. संशयाला कोणतंही औषध नाही. काही दिवसांपूर्वी ती घरातून पळून गेली होती. मी तिला शोधलं. तिची आईच तिला साथ देते. एवढंच नाही तर केस करण्याचीही धमकी देते.’

संदीप नहारने पुढे व्हिडिओमध्ये म्हटलं की, ‘कंचनचा २०१५-१६ मध्ये एक एक्स होता. ज्याच्यासोबत सहा वर्ष ती राहिली होती. तिने आपल्या एक्सला एका खोट्या आरोपाखाली तुरुंगात पाठवलं. मला तिची दया आली होती म्हणून मी लग्न केलं. पण आमच्यात कोणतीच गोष्ट सारखी नव्हती. करोना काळात जेव्हा आम्ही घरी गेलो होतो. तेव्हा तिचं मोठ्या प्रेमाने स्वागत केलं.’

‘मित्रांनो, मी काही केलं तर तिने (कंचन) माझ्या घरातील सदस्यांना त्रास देऊ नये. ती माझ्या कुटुंबाचा खूप द्वेष करते. त्यांच्याविरोधात तिने केस करू नये. माझी बुलेट मला बाबांना द्यायची आहे. सोनसाखळी आईला द्यायची आहे. पैसे कंचनने घ्यावेत. ती स्वतःच्या चुका कधी मान्य करत नाहीत. तिला तिच्या चुका लक्षात याव्यात अशी अपेक्षा आहे. जर भविष्यात तिने लग्न केलं तर त्या माणसाने सर्वात आधी तिच्या मेंदूवर काहीतरी उपचार करून घ्यावेत.’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here