‘अटॅक’च्या सेटवर जॉन अब्राहम जखमी

मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) – बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अ‍ॅक्शन हिरो जॉन अब्राहम आजकाल त्याच्या आगामी ‘अटॅक’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. तो सतत या चित्रपटाशी संबंधित फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतो. या चित्रपटात जॉन पुन्हा एकदा अ‍ॅक्शन सीन्स करताना दिसणार आहे. दरम्यान, याच चित्रपटाच्या सेटवर जॉन शूटिंग करताना जखमी झाल्याची बातमीस समोर येत आहे.

जॉन अब्राहम याने स्वतः सोशल मीडियावर एक फोटो आणि व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्याला दुखापत झाल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शूटिंग दरम्यान जॉनच्या पाठीवर काचेची ट्यूबलाईट फोडण्यात आली. यावेळी काचेचे काही तुकडे जॉनच्या चेहऱ्याला लागले आणि रक्त येऊ लागल्याचे या फोटो आणि व्हिडीओत दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here